औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेची संशयित मोटारसायकल वाहनांवर कारवाई

0

पैठण,दिं,२६.(प्रतिनिधी) : औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेची संशयित मोटारसायकल वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

    सदरील कारवाई औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया , अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक  किशोर पवार यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गायकवाड व पोलीस जमादार बाळासाहेब लोणे असे दोघेजण औरंगाबाद ते पैठण रोडवरील चितेगाव टोलनाका येथे मोटार वाहन केसेस करीत असताना मोटारसायकल क्र. 1)  MH-20-BD-7050  TVS STAR चा चालक नामे रामेश्वर विठ्ठल चाबुकस्वार वय 30 वर्ष रा. गावंतांडा बालानगर ता. पैठण  ,मो. सा. क्र. 2) MH-20-AP-8683 GLAMOR चा चालक नामें आवेज इब्राहिम बागवान वय 27 वर्ष रा. बागवान गल्ली, बिडकीन ता. पैठण , मो. सा. क्र. 3) MH-20-AH-6750 SPLENDER चा चालक नामे शरद कल्याण कुंडकर वय 21 वर्ष, रा. नायगाव खांडेवाडी ता. पैठण  असे मोटारसायकल चालकांना वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी थांबवून त्यांना त्यांचे ताब्यातील वाहनाचे कागदपत्रे मागणी केली असता चालकांनी कागदपत्रे नसल्याचे व सदर मोटार सायकलचे मालक कोण आहेत याबाबत त्यांना काही एक माहिती नसल्याचे चालकांनी सांगितले आहे यावरून तिनही मोटारसायकल चोरीच्या असल्याबद्दलचा संशय आल्याने तिनही मोटार सायकल व वरील नमूद चालक  यांना बिडकीन पोलीस ठाण्यात जमा केले असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर गायकवाड यांनी दिली असून पुढील तपास बीडकीन पोलिस करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here