फलटण प्रतिनिधी.
फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयू साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यांनी कारखान्याची एक कोटी पंधरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांना विरोधात लोणंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की पोलिसांनी फॅब्रिक इंडस्ट्रीज व ऍक्युरेट इंजिनिअरिंग अँड इरेक्शनचे काम करणारे वसंत लोढा, अहमदनगर आणि सांगलीतील प्रसाद अण्णा या दोन ठेकेदारांसह शरयू इंडस्ट्रीज मधील वरिष्ठ अभियंता संतोष खोले मुख्य अभियंता महादेव भंडारे आणि वरिष्ठ अभियंता संजय मुळे या पाच जनावर गुन्हे दाखल केले आहेत. वसंत लोढा आणि प्रसाद अण्णा यांनी वेगवेगळ्या सरकारी व निमसरकारी कंपन्यांचे बनावट दाखले आणि सही शिक्के असलेली कागदपत्रे सादर केली. तसेच संतोष खोले, महादेव भंडारे आणि संजय मुळे यांना पैशाचे आम्ही दाखवत हाताशी धरले. प्रत्यक्षात कोणतेही नवीन काम न करता जुनी मशिनरी आणि साहित्यालाच नव्याने काम केल्याचे दाखवून कंपनीची एक कोटी 14 लाख 90 हजार 358 रुपयांची फसवणूक केली आहे. त्या प्रकरणी वरील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणंद पोलीस याचा तपास करीत आहेत. हा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू होता. बहुतेक अधिकारी संगनमत करून आपापला फायदा पहात होते. संबंधित अधिकाऱ्यांची बँक खाती तपासली असता वरील दोन ठेकेदारांनी ज्या अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक मोठ्या रकमा हस्तांतरित केले असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले