देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
बलात्कार गुन्ह्यात फरार असलेल्या राहुरी पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यास अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी फिर्यादी महिलेने उद्या १५ ऑगस्ट रोजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई मंत्रालयासमोरील दलनासमोर आत्मदहनकरण्याचा इशारा दिला आहे. त्या अशायाचे निवेदन या पीडित महिलेने सरकारकडे पाठविले आहे.
गेल्या महिन्यात दवणगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यावर काही वेळेतच राहुरीच्या पोलिसांनी नाऱ्हेडा यास पळून जाण्यासाठी मदत केली.नाऱ्हेडा हा राहुरी पोलिसांच्या संपर्कात असुन पोलिसांना हा आरोपी कुठे लपलेला आहे.हे माहित असतानाही केवळ पोलिस असल्याने त्याचा शोध घेतला जात नाही.
राहुरी पोलिसांना नाऱ्हेडा अजून पोलिसांना मिळाला नसून तातडीने अटक करावी व पोलीस दलातून निलंबित करावे या मागणीसाठी सदर पीडित महिलेने उद्या १५ ऑगस्ट रोजी गृहमंत्री फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.