पाटण /प्रतिनिधी (संजय कांबळे) :
पाटण व कराड तालुक्याचे डॉ. वसंतराव दत्तात्रय सवाखंडे यांचे अमेरिकेत उपचारा दरम्यान आकस्मिक निधन झाले.
अमेरिकेत नातेवाईकांकडे असताना त्यांना हद्यविकाराचा धक्का आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, आखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यंच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, भाऊ,असा मोठा परिवार आहे.
पाटण तालुक्यात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने गरिबांचा डॉक्टर अशी ओळख निर्माण केली होती, पाटण शहरातील चाफोली रोड परिसरात त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून दवाखाना आहे, तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून ते काही काळ पाटण ग्रामीण रूग्णालयात कार्यरत होते. गेले ४० वर्षे त्यांनी गोरगरिबांना कर्तव्यतत्पर वैद्यकीय सेवा दिली. पाटणच्या डोंगरदरयातील गावांतून दवाखान्यात आलेल्या आजारी माणसाकडे पैसे असोत की नसोत मात्र कोणतीही रुग्ण उपचार घेतल्याशिवाय माघारी जात नसत.
त्याचबरोबर ते सामाजिक कार्यात सुद्धा तन मन धनाने सहभागी होत असत. त्यांच्या आकस्मिक निधनाने मित्र परिवार पाटण -कराड तालुक्यातील मित्र परिवार शोकसागरात बुडाला असुन पाटण तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान डॉ सवाखंडे यांचे पार्थिव
रविवार दि. ०३/०९/२०२३ रोजी कराड या ठिकाणी राहत्या घरी सकाळी ८ ते ११ या दरम्यान अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व अंत्य संस्कार कराड येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.