पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी) : मुंबई येथील ग्रेटर बॉम्बे टीचर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत येथील मिश्रीलाल पहाडे जैन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थि हर्षित स्वप्नील बाहेती ह्याने महाराष्ट्र स्तरावर यश मिळवले असून, त्याला कास्या पदक देऊन गौरविण्यात आले आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र तून ८३ हजार विद्यार्थी बसले होते.
विद्यार्थ्यांमध्ये संसोधन वृत्तीचा विकास व स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करता यावी, यासाठी ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान, या यशाबद्दल आशा विहार रामनगर पैठण येथे त्याचा चंद्रकांत झारगड स, विजय बोबडे सर, कल्याण सोनवणे , हरिश्चंद्र धांडे, अरविंद शिंदे , संजय खांडेकर , स्वप्नील बाहेती ,पाटील,अॅड ऊगले ,स्वप्निल लोंढे, शिंदे यांनी सत्कार केला.