सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना नुकताच लुम्बिनी प्रतिष्ठानचा आदर्श आंबेडकरवादी कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याने संबोधी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला.
येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांच्या हस्ते वीर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष वाघमारे,लेफ्टनंट डॉ.केशव पवार,प्रा.तानाजी देवकुळे,संबोधी प्रतिष्ठानचे कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ, उपाध्यक्ष इंजि. रमेश इंजे,विश्वस्थ प्राचार्य संजय कांबळे,यशपाल बनसोडे,किशोर बेडकिहाळ, प्रा. कु.इंजे,ऍड.कुमार गायकवाड, प्रा.संजयकुमार सरगडे,डी.एस. भोसले,विनोद यादव,प्राचार्य रमेश जाधव,वसंत गंगावणे,अरुण जावळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.विश्वस्थ डॉ.सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले.