फरार आरोपींना अटक झाल्याने पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील रिपब्लिकन सेनेचे आंदोलन स्थगित !

0

सातारा  : दहिवडी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांच्या टीमने संयुक्त अशी कामगिरी करून अखेर सुरज शिलवंतच्या आत्महत्त्येस प्रवृत्त असणाऱ्यांना अटक केली आहे.त्यामुळे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानासमोर पुकारलेले आंदोलन स्थगित केले आहे.

            याबाबतचे सविस्तर वृत्त असे,दहिवडी पोलीस ठाणे रजिस्टर नंबर 317/2024, ipc 306, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि सावकारकी ऍक्ट प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात सुरज सुनील शीलवंत यांनी आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर आरोपी यांचा अटकपूर्व जामीन माननीय सत्र न्यायालय वडूज यांनी फेटाळल्यानंतर सुद्धा हे आरोपी फरार होते.सदर आरोपींना पकडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पथक नेमणेबाबत व आरोपी अटक करणेबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या.त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्यातील आरोपी नावे संजय शेडगे व आदर्श कट्टे हे अनुक्रमे मध्य प्रदेश, इंदोर आणि राजस्थान बॉर्डर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे  दोन्ही आरोपींच्या बाबत खबऱ्यांमार्फत आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी काम केलेले आहे.त्यांची नावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस हवालदार  रामचंद्र आप्पासो. तांबे,पोलीस हवालदार रविंद्र बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश पिराजी पवार अशी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here