जामखेड तालुका प्रतिनिधी :
कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद यांच्या सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री प्रा राम शिंदे आ सुरेश धस, आ.आतुल भातकळर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे..
दि २३ रोजी मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री प्रा राम शिंदे आ सुरेश धस आ आतुल भातकळर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालींग कोरे, माजी सरपंच हरिभाऊ ढवळे, भगवान देवकाते, शिवसेनेचे जामखेड शहर प्रमुख सुरज काळे यांच्या सह अनेक कार्यकर्तेनी जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना मधुकर राळेभात म्हणाले की मागे अनेक वर्षे शिवसेनेत राहिलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षा बरोबर संबंध होते. त्यानंतर विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यानंतर काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी आ रोहित पवार यांनी आम्हाला कुकडीचे पाणी देऊ मतदार संघाची बारामती करू अशी आश्वासने दिली परंतु त्यांच्या कडून निराशा झाली आहे. काम करत असताना कार्यकर्तेना विश्वासात घेतले नाही. कुणाच्याही हाताला काम दिले आहे. मानसन्मान दिला नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला व आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या कामाची पद्धत माहीत आहे संबंधही चांगले आहे त्यामुळे प्रवेश केला आहे.