विवाहितेचा हुंड्यासाठी छळ पती, सासू ,दिरांसह आठ जणांवरील गुन्हा रद्द.

0

छत्रपती संभाजीनगर,

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायाधीश श्रीमती विभा कंकणवाडी  व न्या. जोशी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार कोपरगाव येथील प्रमोद बाळासाहेब गहिरे व अन्य सात जणांच्या विरुद्ध पैठण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 204 /2024 दिनांक 20 मे 2024 भारतीय दंड संहिता कलम 323, 498 अ,504, 506 अंतर्गत दाखल केलेली तक्रार रद्द करण्यात आलेली आहे 

 

 सविस्तर वृत्त असे की दिपाली प्रमोद  गहिरे वय 23 राहणार पैठण कहार वाडा यांनी पती प्रमोद बाळासाहेब गहिरे व सासू छायाबाई गहिरे, चुलत सासू संगीता मगन गहिरे ,दीर, राकेश गहिरे, नणंद ,व तीन नंदोई सुनील कुंडारे सुरेश डिंबर राहणार ,गांधीनगर कोपरगाव. अशा आठ जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात माहेरून 50 हजार रुपये घेऊन ये यासाठी शारीरिक मारहाण व मानसिक छळ केला याबाबत गुन्हा दाखल केला होता. 

  त्याविरुद्ध माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आरोपी तर्फे ॲड.अमोल अजय पवार यांनी युक्तिवाद करून सदर गुन्हा खोटा असून रद्द करण्यात यावा या साठी विनंती केली होती. सरकारतर्फे ॲड. श्रीमती बारसवाडकर यांनी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here