साताऱ्यात बारबालांचे आणखी एक प्रकरण उघडकीस, संशयित ताब्यात

0

भिलार : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील एका हॉटेलवर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन बारबाला नृत्य करीत असताना पाचगणी पोलिसांनी छापा टाकला. या नृत्यांगनांसह २० ग्राहक संशयितांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचगणी सारख्या जागतिक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणून त्यांना संगीताच्या तालावर कमी कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करण्याचे प्रकार सुरू आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व वाईचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी काल (मंगळवारी) रात्री याबाबत माहिती मिळताच त्यांच्याकडील खास पथकाने भिलार, कासवंड हद्दीतील एका हॉटेलवर कारवाई केली.

सपोनि दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, सहाय्यक फौजदार रवींद्र कदम, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, कैलास रसाळ, विनोद पवार, सचिन बोराटे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, सुमित मोहिते, रेखा तांबे या टीमने कारवाई करत ग्राहकांसमोर बिभत्स हावभाव करणार्‍या नृत्यांगनासह 20 ग्राहकांवर कारवाई केली. घटना स्थळावरून साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकूण 25 लाख 45 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here