पिरवाडी येथे भुरट्या चोरांनी दोन बंगले फोडले !

0

सातारा : येथील पिरवाडी येथील मकरंद दादासाहेब केंगार यांचा बांगला अज्ञात चोरट्यांनी फोडला.पहाटेच्या वेळेस आतून लावलेल्या कड्या शांततेत तोडून प्रवेश करून दोन मोबाईल व खिसे-पाकिटातील सुमारे रु.१० हजार घेऊन पहाटे पाचच्या दरम्यान बाहेरून कड्या लावून पोबारा केला.

       पहिल्या मजल्यावर मकरंद व त्यांचे कुटुंबीय एका खोलीत तर त्यांचे वडील दादासाहेब केंगार तळमजल्याच्या खोलीत पत्नी व नातीसह गाढ झोपले होते.पहाटेच्या वेळेसच चोरट्यांनी आतील कड्या तोडून साफसफाई करण्याचा पुरेपूर फायदा उठवला.

त्या दरम्यान घरातील सर्वजण शांतपणे झोपले होते.मात्र,पहाटे पाचच्या वेळी सौ.केंगार उठल्यानंतर बाहेर हॉलमध्ये येताच चोराने पोबारा केल्याचे अदृश्य अशी छाया पाहिली. त्यांना वाटले मुलगा मकरंदच बाहेर गेला असेल.मकरंदला शोधण्यासाठी वडील बाईकवरून शोध घेण्यासाठी बाहेर पडले.त्यांनी मकरंदला फोन केला तर ते आपल्या खोलीतच झोपले असल्याचे सांगितले.तद्नंतर चोरांचा प्रताप लक्ष्यात आला.मकरंद यांनी १०० नंबरवर पोलिसांना कळविले.त्यांनीही सकाळी येऊन चौकशी दुपारपर्यंत करीत होते.

     दरम्यान,दोन मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या शिंदे यांचा बंद असलेल्या बंगल्याची मोडतोड केली असून एक बाईक चोरट्यांनी घेऊन गेलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here