जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

0

फुलंब्री  :- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद ता-फुलंब्री येथे अभिवादन सभा घेण्यात आली.

 या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे मॅडम होत्या.प्रमुख उपस्थितीमध्ये मंगला पाटील,विलास चव्हाण, संगीता वाढोनणकर,स्वप्निल पाटील,रूपाली घुगे हे उपस्थित होती.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील इयत्ता पहिलीपासून तर आठवी पर्यंतच्या २७ विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आपली भाषणे,गीते सादर केली.

शाळेतील सहशिक्षक सांडू शेळके व नितीन शेळके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात मंगल वेळे यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार चालण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय विद्यार्थिनी कल्याणी लहाने व संध्या कापडे यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन सहशिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here