शिव प्रतिष्ठान करंजाडे तर्फे जागतिक जल दिन साजरा.

0

उरण (विठ्ठल ममताबादे)

शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबविण्यात आली. संकल्पना राबविण्यामागील एकच हेतू आहे सध्या उन्हाळा चालू आहे. मुक्या प्राण्यांना सध्या पाणी मिळत नाही. तसेच पक्षांना दाणे मिळत नाहीत. भविष्यात जश्या माणसाच्या तीन गरजा आहेत तसेच प्राण्यांना देखील पाण्याची गरज आहे हयाचेच भान ठेऊन शिव प्रतिष्ठान ने स्व खर्चाने मुक्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जाजोजागी भांडी ठेवली आहेत व पक्षांसाठी धान्याचे पॉट लावण्यात आले आहेत.

जसं आपणास शक्य होईल त्या सर्व सामाजिक संस्थानी ही योजना राबवावी. आणि समाजापुढेमाणुसकीचा आदर्श ठेवावा असे संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे.ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष सत्यजित पाटील, उपाध्यक्ष प्रशांत निर्मल, खजिनदार संदीप पाटील, राकेश कुसले,प्रशांत शेट्टी, सचिन कुसले,अक्षय मोरे, श्रीकांत निर्मल, रजेश शेलार, अमर सावंत, सुनील अंबावडे, लक्समन घोडसिंगे, अमर कुसले, दिनेश टीमगिरे, शंतनू अथर्व, आनंद पुजारी, रोशन आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here