गंगापूर प्रतिनिधी : वटपा सिरिन्धरो अरण्यविहार कम्मभुमी रांजणगाव ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)* येथे दिनांक २१ मार्च २०२५ रोजी वटपा सोमदेतफ्रा ञाणवजिरोदोम माॅनेस्ट्री थातोन थायलैंड येथील प्रमुख भिक्खु अजाह्न पायरोस यांनी आपल्या भिक्खु संघासह सदिच्छा भेट दिली या मंगल प्रसंगी परीसरातील असंख्य उपासक/उपासकांनी उपस्थित राहून धम्म देसनेचा लाभ घेतला.
पूजनीय भिक्खु अमृतानंद बोधी थेरो यांच्या वतीने पुज्य भिक्खु संघाला भारतीय बुद्ध रूप थाई भिक्खु संघ आणि थाई उपासक उपासिकांना भेट देऊन त्यासह थाई उद्योजिका उपासिका सिरीकोर्न माताजी यांनी उपहार स्वरुपात दान केले. त्याप्रसंगी अजाह्न ख्रुबा पायरोस यांनी उपस्थितांना शील,धम्मदेसना ,आशिर्वाद देऊन धार्मिक प्रसन्न वातावरणात थाई भिक्खू संघ आणि उपासक यांनी मंगलकामना, शुभेच्छा दिल्या…