बंधुत्व न्याय म्हणजे आंबेडकर : बनसोडे
सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकुल परिस्थितीत लढा दिला होता. त्यामुळेच स्वाभिमानाची वाटचाल प्रत्येक क्षेत्रात आंबेडकवादी करत आहेत.तेव्हा आपापल्या संघटनांची झुल बाहेर ठेवून सर्वसमावेशक निर्णयप्रक्रियेत सामील झाले पाहिजे.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक तथा आदर्श आंबेडकरवादी पुरस्कार विजेते अनिल वीर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,पाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अनिल वीर बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे होते.
अनिल वीर म्हणाले, “अन्याय अत्याचाराविरोधार्थ लढण्यासाठी सर्व धार्मिक, सामाजिक व राजकीय संघटना यांनी मतभेद बाजुला ठेवुन हातात हात घालून एकाविचाराने संघटीत झाले पाहिजे. पक्ष संघटनेचे काम करीत असताना इतरांवर टीकाटिप्पणी करायला काहीही हरकत नाही.मात्र, बहुजनांची एकत्रीत संघटना अथवा फेडरेशन सारख्या संघटनेच्या माध्यमातून एकत्रीत येऊन काम करताना चांगुलपणाच जोपासला पाहिजे. कारण,धम्मबांधव म्हणून राजकारणवीरहित एकत्रीत येत असतो.त्यामुळे राजकीय भाष्य करता कामा नये.तरच खऱ्या अर्थाने धार्मिक व सामाजिक हित जोपासता येईल.जिथे संघटन नसते.तिथे गर्दीचा वानवा आढळून येत आहे.तेव्हा कोणत्याही प्रकारचे गट-तट न पाहता एकत्रीत येऊन केलेली जयंती,मिरवणुक व अन्य कार्य उठावदार दिसत असल्याने आपसूकच विरोधकांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. पाटण व महाबळेश्वर तालुक्यात दि.१४ एप्रिल रोजी जयंती ही शहरांत तालुक्याच्यावतीने मोठ्या उत्साहात,मोठ्या संख्येनी व विविध उपक्रमाने साजरी केली जाते.तद्नंतर गावोगावी मे अखेर साजरी केली जाते.त्यामुळे अधिकाधिक संघटन आढळुन येते.”संयुक्त जयंतीचा पाटण पॅटर्न इतरत्र राबवावा.असाही पुनरुच्चार अनिल वीर यांनी केला.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष बंधुत्व धम्मरत्न तथा कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले,
“बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना हक्क व अधिकार दिलेत.त्यामुळेच हर्षोल्लास आपण करीत आहोत.तेव्हा तो कायम टिकविण्यासाठी त्यांच्या विचारांची गल्लत करता कामा नये.तेव्हा जनशक्ती उभी करून संविधान अबाधित ठेवले पाहिजे.”
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा स्वागताध्यक्ष प्रा.रवींद्र सोनावले म्हणाले,”कोणत्याही संघटनेच्या पदाधिकारी अथवा प्रतिनिधी यांच्याजवळ कार्यकर्त्यांचे मोहळ असले पाहिजे.केडरपद्धतींचा अवलंब करून कार्यकर्ते निर्माण झाली पाहिजेत.”
भारतीय बौद्ध महासभेचे तारळे विभागीय अध्यक्ष गौतम माने म्हणाले,”विज्ञानाच्या आधारावर गौतम बुद्धांचा धम्म आहे.तेव्हा विचारांवर वाटचाल केली तर धम्म चळवळ वाढू शकेल.” वंचितचे तालुका महासचिव शंकर शिंदे (गारवडेकर) म्हणाले, “बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे.” सूर्यकांत झिंब्रे म्हणाले,”नवा समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी ऊर्जा दिली आहे.त्याचा वापर करीत संस्कारक्षम पिढी निर्माण केली पाहिजे.” ऍड.संदीप कांबळे म्हणाले,”३२ डिगऱ्या घेऊन अलौकित कार्य करणारे बाबासाहेब यांची जयंती ५२ पेक्षा अधिक देशात साजरी होत असते.” मृणालिनी समाधान बनसोडे म्हणाल्या,” बंधुत्व न्याय म्हणजेच आंबेडकर होय.”असे स्पष्ट करीत त्यांनी आंबेडकर नावाबद्धल अनेक व्याख्या स्पष्ट केल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष तथा समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे म्हणाले,”समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातील. भविष्यात भक्कमपणे समितीची वज्रमुठ तयार करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी एकत्र येण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील राहिले पाहिजे.”
यावेळी ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते एस.पी.जाधव,वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप,रेखाताई जाधव,ऍड. विलास वहागावकर, शिवाजी कांबळे (आडदेव),आनंदा दाभाडे,श्रीरंग कांबळे आदींनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली. प्रथमतः महापुरुषांच्या मूर्तींना पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. संपूर्ण विधी सामुदायिकपणे पार पाडला. सुनील माने यांनी सूत्रसंचालन केले.सदरच्या कार्यक्रमास जि. प.माजी सदस्य बापूराव जाधव, आबासाहेब भोळे,रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवकांत, वंचितचे तालुकाध्यक्ष जाधव, यशवंत दाभाडे,राहुल रोकडे, रुपेश सावंत,विलास चव्हाण,काकडे, गायकवाड मनोज भंडारे,विजय भंडारे आदी धार्मिक,राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, उपासिका,उपासक व आंबेडकरवादी प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते.