काहीबाही बोले राही
फेके उष्ट्या पत्रावळी
स्वैराचारी मुक्त कुणी
प्रसिध्दीला उतावळी…
दात विचकूनि हसता
घाले बनावट कवळी
कावीळ असे कसली
झाली नजर पिवळी….
शब्दांची आतषबाजी
सजे बुध्दीची दिवाळी
लक्तरे मांडतो अब्रुची
चविष्ट खातो फराळी…
बोलून जातो बोलता
अकारण देतात बळी
विकृत हास्य विस्फुटे
आमच्या गाली खळी
त्रस्तव्यस्त इतके का
हास्यासाठी तळमळी
धन्यझाले कान कसे
सहनकरतो मळमळी
दुर्मिळ दुर्लभ हसणे
माणसे बनवे दुबळी
कुणी येतो मातवितो
समाजात खळबळी
वेटिंग ..
कधींकधीं नेत्यांना
करावे लागे वेटींग
हाय कमांड सतावे
मुळीजमेना मिटींग
काम व्हावे यशस्वी
सर्वत्र लावा सेटिंग
बाकीचे मॅटर साफ
झकास करे कटिंग
आपणा मताधिक्य
यशस्वी हो व्होटिंग
सट्टे बाज नेम बाज
बाहेर लागले बेटिंग
गाडी योग्य रुळावर
उचीत लावा शंटिंग
जपून रहावे जरासे
लपूनकाढती शूटिंग
रे पुरावे खोल पुरावे
होऊ द्या पूर्ण हंटिंग
सावध सतर्क संपूर्ण
शरण येतीलं धटिंग
आपलेचं आहेमैदान
नीट लावा फिल्डींग
हक्क पक्ष कार्यालय
उभी करुया बिल्डिंग
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996