MS Dhoni statement angry reaction after Chennai Super Kings defeat against Sunrisers Hyderabad IPL 2025 CSK vs SRH | IPL 2025: ‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?

0

[ad_1]

IPL 2025 CSK vs SRH MS Dhoni Statement: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला हवा तास विजयाचा सूर अजूनही गवसला नाहीये. ऋतुराज गायकवाडकडून धोनीकडे कर्णधारपद गेल्यावर काहीतरी बदल होतील, विजय मिळेल असं वाटलं हॉट परंतु तसे झालेले दिसत नाहीये. चेन्नईचं आयपीएल 2025 मध्ये पराभवाचं सत्र सुरूच आहे. शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ( CSK vs SRH) त्यांना 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स संघाने पहिल्यांदाच विजय मिळवला. या सिजनमधील चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज हा सातवा पराभव आहे. या पराभवासोबत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. या  पराभवानंतर, संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप संतप्त दिसत होता. 

फलंदाजी अजून चांगली झाली असती 

धोनीनुसार त्याचा संघ 15-10 धावा कमी करू शकला. चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 154 धावांवर सर्वबाद झाला. सनरायझर्सने 18.4 षटकांत 5 गडी गमावून 155 धावा करून सामना जिंकला. 13 व्या षटकात 4 बाद 114 धावा झाल्यानंतर, संघाने शेवटच्या सहा विकेट फक्त 40 धावांमध्ये गमावल्या.

हे ही वाचा: “अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल…”; ट्रोलिंगनंतर नीरज चोप्राचं स्पष्टीकरण

 

धोनीने फलंदाजांवर साधला निशाणा 

 धोनी सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला की, “मला वाटतं आम्ही सतत विकेट गमावत राहिलो आणि दुसरे म्हणजे, मला वाटलं की पहिल्या डावात विकेट थोडी चांगली होती. 155 (154) धावसंख्या योग्य नव्हती कारण ती जास्त टर्न होत न्हवती. हो, आठव्या, नवव्या किंवा दहाव्या षटकानंतर वेगवान गोलंदाजांसाठी ते दोन तर्फी झाले. पण त्यात असामान्य काहीही नव्हते. म्हणून मला वाटतं आम्ही थोडी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. बोर्डवर आणखी काही धावा जोडता आल्या असत्या.” 

 

 

 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here