सूर्यकुमारने तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा पहिलाच फलंदाज

0

[ad_1]

IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळताना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. आयपीएलच्या एका सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारपूर्वी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून 610 धावा केल्या होत्या. 

आयपीएल 2025 मध्ये सोमवारी 26 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावून 184 धावा केल्या. यात मुंबईकडून सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादव (57 ) ने केल्या. 

आयपीएलच्या 18 वर्षांचा इतिहास पहिला तर मुंबई इंडियन्सकडून एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला फलंदाज आहे. त्याने धावांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे सोडलं असून त्याने आयपीएल 2025 मध्ये 625 धावांचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने  2010 मध्ये 618 आणि 2011 मध्ये 553 धावा केल्या होत्या. 

मुंबई इंडियन्ससाठी एका सीजन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत, सूर्या आणि सचिन वगळता टॉप-5 मध्ये फक्त एकच नाव आहे. सूर्या आणि सचिन पहिल्या चार स्थानांवर आहेत. या यादीत लेंडल सिमन्स 540 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा 538 धावांसह सहाव्या स्थानावर आहे, त्याने 2013 मध्ये या धावा केल्या होत्या.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 : रियान रिकलटन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

पंजाब किंग्सची प्लेईंग 11 : प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यानसन, हरप्रीत ब्रार, काईल जेमिसन, विजय कुमार वैश्यक, अर्शदीप सिंग

 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here