[ad_1]
Side Effects Of Not Sleeping : आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, तुमच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घयुष्यासाठी तुमची झोप अतिशय महत्त्वाची भूमिका निभवते. वयानुसार प्रत्येकाने आवश्यक इतकी झोप घेणे आवश्यक आहे. हलकी कामाचा ताण आणि कार्यपद्धतीशिवाय इतर अनेक कारणामुळे अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय असते. गरज नसतानाही अनेक जण रात्री विनाकारण जागे राहतात. रात्री न झोपणे ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कमी वयातही लोकांना हृदयविकाराचा झटक्याने जीवाला मुकावं लागतं. (Side Effects Of Not Sleeping Can a heart attack in the morning shocking revelation from a new study)
जर तुम्हीदेखील रात्री जागरण करता किंवा कमी झोप घेता तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय कामाची आहे. कारण स्वीडनमधील उप्पसला विद्यापीठात केलेल्या एका नवीन अभ्यासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. जर तुम्ही सलग तीन रात्री झोप न घेतल्यास हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. हे संशोधन या अर्थाने विशेष आहे की, त्यात निरोगी आणि तरुण लोकांचा समावेश होता. ज्यांना कोणत्याही प्रकारच्या हृदयरोगाचा धोका नव्हता. तरीही, झोपेच्या कमतरतेमुळे त्यांच्या शरीरात जळजळ आणि हृदयरोगाशी संबंधित बदल दिसून आल्या आहेत.
या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. जोनाथन सेडर्नेस म्हणतात की, आतापर्यंतचे बहुतेक संशोधन मध्यमवयीन लोकांवर करण्यात आले आहे. पण या अभ्यासातून असं सिद्ध झालं की लहान वयात झोपेचा अभाव हृदयावर परिणाम करतो. म्हणून, तरुणांनी त्यांच्या झोपेबद्दल देखील जागरूक राहणे अतिशय गरजेचे आहे.
संशोधनात काय सिद्ध झाले?
16 तरुण आणि निरोगी पुरुषांवर हा अभ्यास करण्यात आला. त्याचे वजन सामान्य होते आणि त्याच्या झोपण्याच्या सवयी देखील चांगल्या होत्या. सर्वांना दोनदा झोपेच्या प्रयोगशाळेत राहिला बोलवण्यात आले होते. पहिल्यांदा त्यांना तीन रात्री चांगली झोपण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना फक्त 4 तासांची झोप घेण्यासाठी सांगण्यात आले. या काळात खाणे, पिणे आणि इतर क्रियाकलापांवरही नियंत्रण ठेवण्यात आले. दररोज सकाळी आणि संध्याकाळी रक्ताचे नमुने घेतले गेले, शक्यतो 30 मिनिटांच्या जोरदार व्यायामानंतर शास्त्रज्ञांनी सुमारे 90 प्रकारच्या प्रथिनांचे परीक्षण करण्यात आले. ज्यात त्यांच्या शरीरात जळजळ आणि हृदयाशी संबंधित आजार दिसून आलेत.
आरोग्यावर काय परिणाम झाला?
जे लोक फक्त 4 तास झोपतात त्यांच्या रक्तात हृदयरोग आणि शरीरात जळजळ होण्याशी संबंधित अनेक प्रथिनांचे प्रमाण वाढल्याच पाहण्यात आले. हे तेच प्रथिने आहेत जे हृदय अपयश आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळा यासारख्या आजारांशी जोडलचं पाहिला मिळालं. दरम्यान या अभ्यासात असेही दिसून आलं की व्यायामामुळे शरीरासाठी फायदेशीर असलेल्या काही प्रथिने देखील वाढल्या. याचा अर्थ असा की जरी तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसली तरीही व्यायामाचे काही फायदे मिळतात. पण कमी झोप घेऊन व्यायाम केल्याने हृदयाच्या स्नायूंवर थोडा जास्त परिणाम पाहिला मिळतो.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
[ad_2]