[ad_1]
IPL 2025 Playoffs Timetable Date Time Venue: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील लीग स्टेजमधील शेवटचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावांची टांकसाळ घातली. या सामन्यामध्ये 450 हून अधिक धावा झाल्या. दोन्ही संघांच्या गोलंदाजांची सुमार कामगिरी, आरसीबीला ऐनवेळी लाभलेली नशिबाची साथ, दोन्ही कर्णधारांची भन्नाट फटकेबाजी अशा अनेक गोष्टी या सामन्यात पाहायला मिळाल्या. मात्र या सामन्यामध्ये आरसीबीने विजय मिळवत पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे.
लीग स्टेजमधील स्पर्धा संपल्याने आता पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जचा संघ आरसीबीविरुद्ध मैदानात उतरले तर एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचा संघ आमने-सामने असणार आहे. म्हणजेच आरसीबीच्या धमाकेदार कामगिरीमुळे आता एलिमिनेटरच्या माध्यमातून गुजरात किंवा मुंबईचा पत्ता नक्कीच कट होणार. त्यामुळे हा सामना ‘फायनल पूर्वीचा फायनल’ ठरणार आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या स्थानी राहिल्याने आरसीबीला अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याच्या दोन संधी मिळणार आहेत. कारण पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होणार संघ पुन्हा एलिमिनेटरमध्ये जिंकलेल्या संघाविरुद्ध खेळेल. आता प्लेऑफचे सामने कधी आणि कुठे होणार हे पाहूयात पण त्याआधी कालच्या सामन्यात काय झालं ते जाणून घेऊयात…
लखनऊकडून कर्णधार पंत चमकला
आरसीबीचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लखनऊच्या संघाने 227 धावांचा डोंगर उभा करुन हा निर्णय चुकीचा तर ठरला नाही ना असं वाटण्याइतकी दमदार फलंदाजी केली. लखनऊच्या संघाकडून सलामीवीर मिचेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दमदार फटकेबाजी केली. मिचेल मार्शने 37 बॉलमध्ये 67 धावा केल्या. मार्शने 4 चौकार आणि पाच षटकार लगावले. तर 227 धावांमध्ये सर्वाधिक योगदान कर्णधार पंतने दिलं. पंतने 61 बॉलमध्ये 118 धावा केल्या. यामध्ये पंतने 11 चौकार आणि 8 षटकार लगावले. पंतच्या कामगिरीच्या जोरावर आता हा सामना लखनऊन सहज जिंकणार असं वाटत होतं. मात्र आरसीबीच्या फलंदाजांच्या मनात काहीतरी वेगळच होतं.
आरसीबीची विक्रमी कामगिरी
11 हून अधिक धावांची प्रत्येक ओव्हरमध्ये आवश्यकता असताना सलामीवीर फिलीप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली. सहाव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 61 असताना सॉल्ट बाद झाला. त्यानंतर सबस्टिट्यूट म्हणून आलेला पाटीदारही स्वस्तात परतला. लिव्हिंगस्टोनतर भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत 33 धावांची भर पडल्यानंतर आणि लक्षाचा पाठलाग करताना अर्धा टप्पा ओलांडल्यावर विराट मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर सामना आरसीबीच्या हातून गेला असं मानलं जात होतं. मात्र मयांक अग्रवाल आणि जितेश शर्मा या दोघांनी 100 हून अधिक धावांची नाबाद भागिदारी करत संघाला 8 चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना हा आरसीबीचा सर्वात मोठा विजय ठरला.
प्लेऑफचे सामने
पहिला क्वालिफायर सामना – पंजाब किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – 29 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता (चंदीगढ)
एलिमिनेटरचा सामना – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स – 30 मे रोजी सांयकाळी साडेसात वाजता (चंदीगढ) या दोघांपैकी एक संघ याच तारखेला म्हणजे 30 तारखेला स्पर्धेबाहेर पडेल.
दुसरा क्वालिफायर सामना – पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर जिंकणारा संघ – रविवारी 1 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता (अहमदाबाद)
अंतिम सामना – पहिल्या क्वालिफायरचा विजेता विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता संघ – मंगळवारी 3 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता (अहमदाबाद)
[ad_2]