IND vs ENG: टीम इंडियात परतताच ठोकलं द्विशतक, करुण नायरने उडवली इंग्लंडची झोप

0

[ad_1]

IND VS ENG : भारताचा टेस्ट संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात 20 जून पासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. या टेस्ट सीरिजसाठी भारताचा संघ इंग्लंड दौरा करणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. यात तब्बल 8 वर्षांनी स्टार फलंदाज करुण नायर याला संधी देण्यात आली. याच करुण नायरने टीम इंडियाच्या अ संघाकडून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध  खेळत असताना द्विशतक ठोकलं आहे. 

अनेक वर्षांनी भारताच्या टेस्ट संघात परतलेल्या करुण नायरची बॅट थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचणारा आणि शतकांची माळ लावणारा फलंदाज इंग्लंड विरुद्ध टेस्ट संघात सुद्धा अशीच कामगिरी करताना दिसत आहे. भारताच्या अ संघाकडून खेळत असताना करुण नायरने द्विशतक झळकावलं आहे. सध्या भारत अ आणि इंग्लंड अ या संघांमध्ये पहिला अनऑफिशियल टेस्ट सामना खेळवला जात असून यात त्याने हा कारनामा केला आहे. 

करुण नायर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा दुसरा फलंदाज आहे. सध्या भारत अ आणि इंग्लंड अ या संघांमध्ये पहिला अनऑफिशियल टेस्ट सामना खेळवला जात असून सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी करुण नायरने तब्बल 204 धावांची खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. हे द्विशतक ठोकत असताना करुण नायरने 26 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या फलंदाजाने 281 चेंडूंचा सामना केला आणि 72 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

इंग्लंड लायन्स संघाची प्लेईंग 11:

टॉम हेन्स, बेन मॅककिनी, एमिलियो गे, मॅक्स होल्डन, जेम्स र्यू (कर्णधार आणि विकेटकिपर), डॅन मौसली, रेहान अहमद, जमान अख्तर, एडवर्ड जॅक, जोश हल, अजित डेल

भारताच्या 1 संघाची प्लेईंग 11 :

अभिमन्यू इसवरन (कर्णधार ), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, हर्ष दुबे, अंशुल कंबोज, हर्षित राणा, मुकेश कुमार



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here