मतदानास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;सभासद मतपेटीतून उमेदवारांचे भवितव्य ठरविणार…
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरीची कामधेनू डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दि. ३१ मे रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पहावयास मिळाला आहे.तब्बल ९ वर्षा नंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर वाहणांची व माणसांची गर्दी पाहवायस मिळाली आहे. २१ हजार सभासद मतदारांपैकी १२हजार ६६२ मतदारांनी तर ‘ब’ वर्गासाठी १९० मतदारांपैकी १८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.सरासरी एकुण ५९;४० टक्के मतदान झाले आहे. उद्या १ जून रोजी मतमोजणी होणार डॉ तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या कुणाच्या ताब्यात जाणार हे निकालानंतर समजणार आहे.
बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ, युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आज सकाळ पासून राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
सकाळी ७ ते १० या वेळेत १ हजार ६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दुपारी १२ वाजता मतदारांचा मोठा उत्साह या दिसून आला आहे. ४ हजार ४४९ मतदारांनी तर दुपारी २ वाजे पर्यंत ८ हजार २९१ मतदारांनी दुपारी ४ वाजे पर्यंत ११ हजार ५८९ मतदारांनी सायंकाळी ६ वाजे पर्यंत १२ हजार ६६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. तर ‘ब’ वर्गासाठी १९० मतदारांपैकी १८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला आहे.
यावेळी जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, सुरेश वाबळे, रावसाहेब चाचा तनपुरे तसेच शेतकरी विकास मंडळाचे राजुभाऊ शेटे, राजेंद्र लोंढे तर कृती समितीचे अमृत धुमाळ, पंढरीनाथ पवार, आप्पासाहेब दुस मतदारांना अभिवादन करत होते. कारखान्याचे सभासद हे मोठ्या प्रमाणात वयोवृध्द असल्याने त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ राहुरी फॅक्टरी येथे होती.
मतदान प्रक्रिया दरम्यान कार्ले नामक तरुणास गाडी बाजूला घेण्यास रँपिड अँक्शन फोर्सच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले असता संबधित अधिकाऱ्यांस शिविगाळ केल्याने राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक समाधान पडवळ हे समजावून सांगत असताना कार्ले या तरुणाने पडवळ यांची गचांडी पकडून शिविगाळ करुन लागला. सदर तरुणास मतदान करुन घेण्याची विनंती केली.मतदाना नंतर कार्ले या तरुणास पोलिसांनी रिंगणात घेवून येथेच्छा धुलाई केली.
प्रांताधिकारी डॉ. किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अदि अधिकारी व कर्मचारी मतदान प्रकियेसाठी परिश्रम घेत आहे. डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे जवळपास २१ हजार सभासदांना मतदानाचा अधिकार असून २१ संचालक हे निवडून दिले जाणार आहेत. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.