उरण (विठ्ठल ममताबादे )
उरण पंचायत समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जितेंद्र चिर्लेकर- प्रशासन अधिकारी , संपदा कटोर राकेश पाटील , सुजन पाटील , डॉ.भोजने , उल्हास पाटील , तेजस जोशी , मीनल मगर आदी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विविध उपक्रम राबवून पंचायत समितीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.