सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सिव्हील हॉस्पीटल) मध्ये कर्ण बधीर रुग्णांना आठवड्यात श्रवण यंत्रे मिळावेत.अन्यथा,जनआंदोलन उभारले जाईल.अशा आशयाचे निवेदन रुग्णालय व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय पुरोगामी काँग्रेस पक्ष,भगतसिंग स्मृती समिती व पुरोगामी घटक संघटना यांच्यावतीने सुपूर्द करण्यात आले.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्व आधार रुग्णालय येथे गेले 6 महिन्यापासून कर्ण बधिर रुग्णांना श्रवण यंत्र मिळत नाहीत. सर्वसाधारण रुग्णालय हे जिल्हयाचे मोठे रुग्णालय आहे. यकर्णबधिरांना तपासणीसाठी जिल्हयातील गावागावतून यावे लागते. अर्ज तपासणी केल्यावर कानाची श्रवण यंत्रे दिली जातात. परतु गेल्या सहा महिन्यापासून संबंधित रुग्णालयाकडून श्रवण यंत्रे मिळत नाहीत.
मुळात सातारा जिल्हा हा दुर्गम भागात असून सातारा जिल्हयातील गरीब शेतमजूर कामगार येत असतात. त्यांचे हातावरचे पोट आहे. अशा लोकांना गाडी खर्च करुन यावे लागते. परंतू त्यांना आज पर्यंत श्रवण यंत्र मिळाले नाही.जर दवाखान्यातून कर्णबधिर रुग्णांना श्रवण यंत्रण देण्याची व्यवस्था न झाल्यास लोकशाही मार्गानी आंदोलन केले जाईल. मग त्याचे परिणामाची सर्वस्वी जबाबदारी शासनावर व संबंधित शासकिय रुग्णालयावर राहील.
सदरचे निवेदन रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी स्मिता लोंढे यांच्याकडे तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तहसीलदार (महसूल) शशिकांत जाधव यांच्याकडे देण्यात आले.यावेळी श्रीकांत कांबळे (अध्यक्ष,राष्ट्रीय पुरोगामी काँग्रेस पक्ष व पुरोगामी घटक संघटना),कॉ.शिरीष चिटणीस,मनोजकुमार तपासे, सलीम आतार,मनीषा साळुंखे, अनिल वीर,सुरेश कुंभार,विजय बोबडे,ऍड. विलास वहागावकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.