एस. एम जोशी कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पथनाट्याचे आयोजन  

0

पुणे /हडपसर प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व हडपसर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून API  हसीना शिकलगार उपस्थित होत्या. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, अंमली पदार्थाच्या व्यसनापासून आपण लांब राहिले पाहिजे. अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमाबाबत काही माहिती प्राप्त होताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली पाहिजे. अंमली पदार्थांचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यासाठी मुलांनी आणि पालकांनी काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी “व्यसनमुक्त समाजासाठी कटिबद्ध” राहिले पाहिजे. असे मत API  हसीना शिकलगार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले की, आजच्या विज्ञानाच्या युगात अंमली पदार्थांचे व्यसन ही समस्या केवळ एका देशापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जगात पसरली आहे. त्यामुळे या समस्येला आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २६ जून हा दिवस “जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन” म्हणून घोषित केला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून अंमली पदार्थांच्या विरोधात एकजूट दाखवली पाहिजे. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी शिक्षण, प्रेम, समजूतदारपणा आणि वेळेवर उपचार घेण्याची सवय लावली पाहिजे. आरोग्यदायी, सुरक्षित आणि प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार करायला पाहिजे. असे मत प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केले. 

यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी सामाजिक प्रबोधन केले. या कार्यक्रमासाठी हडपसर पोलीस स्टेशन मधील  PSI अल्ताप शेख, HC  समीर पांडुळे, LPC धनश्री बांडे, PC. सतीश भारती, PC महादेव कुंभार, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रमाधिकारी उपप्राचार्य प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. निशा गोसावी, प्रा.संजय अहिवळे, डॉ. विलास कांबळे, प्रा. स्वप्निल ढोरे, डॉ. नम्रता कदम, प्रा.दिपक गायकवाड व बहुसंख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here