सातारा : सामाजिक कार्यात सहभाग घेणारे अधिकारी कु.पल्लवी दिलीपराव ताकसांडे यांना सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने यांच्या हस्ते बंधुत्व युवती पुरस्कार प्रदान करण्यात आला.अध्यक्षस्थानी साहित्यिक सुदर्शन इंगळे होते.
व्यासपीठावर सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे शामराव बनसोडे,थेरो दिंपकर,संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे,रिपाइंचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ,संस्थापक अनिल वीर आदी मान्यवर उपस्थीत होते.अंनिसचे किशोर धरपडे यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक प्रकाश काशीळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सुनील माने यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.