सातारा : ना नफा ना तोटा…या तत्वावर ग्राहकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, बेरोजगारांना नोकरीची संधीही उपलब्ध केंद्रामुळे होईल.असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे नेते चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीमध्ये दिक्षा सर्व्हिसेस व भोजनालयचे औपचारिक उद्घाटन वनिताजंनी ग्लोबल एनर्जी प्रा.लि. मॅनेजिंग डायरेक्टर निखिल अपशिंगे, संकेत अपशिंगे, चंद्रकांत खंडाईत , बंधुत्व प्रतिष्ठान संस्थापक अनिल वीर आदींच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाले. तेव्हा खंडाईत उद्घाटपर मार्गदर्शन करीत होते.यावेळी शिंदे परिवारास अनेकांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.
सदरच्या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पाटण तालुकाध्यक्ष आनंदा गुजर, मिलिंद (बापु) कांबळे, तालुकाध्यक्षा कमल कांबळे, सुभाष शिंदे,सुहास शिंदे,भिमराव गवळी (दिवशीकर), विनोद कांबळे, रविराज शिंदे, उज्वला शिंदे,गारवडे ग्रामस्थ, सुजाता कांबळे,गीतांजली दुपटे, प्रफुल्ल दुपटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.वंचितचे पाटण तालुका सचिव प्रो.प्रा. शंकर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.