टपाल कार्यालयातील आधार कार्ड  अद्ययावत करणे बंद असल्याने नागरिकांची अडचण.

0

फलटण प्रतिनिधी 

        फलटण येथील मुख्य टपाल कार्यालयातील आधार कार्ड केंद्र बऱ्याच दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण, गैरसोय झाली आहे. भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्ड ला लिंक करणे, नवीन आधार कार्ड तयार करणे, आधार कार्ड मध्ये असलेली चुकीची माहिती दुरुस्त करणे इत्यादी कामे सध्या मुख्य टपल कार्यालयातील आधार केंद्रामध्ये होत नाहीत. 

                      तांत्रिक अडचणीमुळे आधार कार्ड अध्ययावत  करणे प्रक्रिया बंद असल्याचा सूचनाफलक टपाल कार्यालयात लावण्यात आलेला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून हे काम बंद असून आणखी किमान एक आठवडा तरी हे केंद्र बंद राहणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. परगावावरून येणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वरिष्ठांनी याप्रकरणी तांत्रिक अडचणी दूर करून आधार कार्ड नोंदणी काम पूर्ववत त्वरित सुरू करावे अशी मागणी संबंधित नागरिक करताना आढळतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here