गोडोली, सातारा येथील वसतीगृहात प्रवेश सुरु

0

सातारा दि. 21 : गोडोली सातारा येथे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता आठवी ते उच्चशिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास प्रवर्ग, मधील विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
        प्रवेशित विद्यार्थीनींना  राहण्याची,जेवण्याची मोफत व्यवय्था केली जाते. गणवेश ,स्टेशनरी, सहल, ॲप्रन, प्रोजेक्ट भत्ता दिला जाते. दरमहा विद्यार्थीनींना रुपये 700/-निर्वाह भत्ता दिला जातो.  वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थीनींनी प्रवेश फॉर्म विना मूल्य कार्यालयीन वेळेत घेऊन जावेत. अर्जासोबत  जातीचा दाखला,गुणपत्रक यांच्या झेरॉक्यप्रती जोडणे आवश्यक आहे.

     तरी अनु जाती, अनु जमाती, इतर मागास प्रवर्ग, अनाथ व  दिव्यांग या संवर्गातील विद्यार्थिनींनी मुलींचे शासकीय वस्तीगृह गोडोली,सातारा येथील. वसतीगृहाच्या या पत्त्यावर 125 वी जयंती नवीन मागासवर्गी मुलींचे शासकीय वसतीगृह गोळीबार मैदान रोड, सन्मित्र हौसिंग सोसायटी गोडोली सातारा येथे. त्वरित संपर्क साधावा,असे आवाहन वार्डन मुलींचे शासकीय वसतीगृह, गोडोली,सातारा यांनी  केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here