सातारा दि.21 : प्रादेशिक परिवहन कार्यालयव स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बस चालकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये बस चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबीरास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमा गांधी, नेत्र तज्ञ एम.बी. शिंदे, प्रकाश गवळी, सहायक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे आदी उपस्थित होते.
नेत्र तपासणीमध्ये डॉ. एम.बी. शिंदे, डॉ. वाय.व्ही. पाटोळे, एस.के. नायकवाडी यांनी बस चालकांची नेत्र तपासणी केली. यामध्ये 93 वाहनचालकांना दृष्टीदोष आढळून आला. त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. ज्या वाहनचालकांना मोतीबिंदू आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
डॉ. गांधी यांनी वाहनचालकांच्या आरोग्याची तपासणी करुन उपस्थित वाहन चालकांचे समुपदेशन केले. तसेच रक्तदान, रक्तातील साखर, रक्तातील काविळ इत्यादीची तपासणी करुन निदान झालेल्या वालन चालकांना औषधोपचार व त्याबाबत मार्गदर्शन केले. रक्तातील कावीळ व एड्स याबाबत रुपाली कदम यांनी तपासणी करुन जनजागृती केली. मौखिक आरोग्य व कर्करोगाची दिपाली जगताप, अनिकेत गावडे यांनी तपासणी करुन धुम्रपान या विषयी माहिती सांगितली.
या शिबीरामध्ये 150 बस चालकांची संपूर्ण आरोग्य व नेत्र तपासणी करुन ज्यांना दृष्टीदोष आढळला त्यांना मोफत चष्यांयाचे वाटप करण्यात येणार आहे. रक्तदाब, रक्तातील साखर, दंतवैद्य आजारावरही औषधोचार करण्यात येणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चव्हाण यांनी रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन करुन प्रत्येक तालुक्यात बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.