सातारा/अनिल वीर : जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची पूर्व व पश्चिम तसेच महाविहार बांधकाम समिती व ऑडीट कमिटी यांची सयुक्त सहविचार सभा महाविहार,गोळेश्वर येथे संपन्न झाली.
महाविहार व्यवस्थापन व महाविहार देणी देण्यास बंधी तसेच पुढील कार्यवाही कशी करावी ? याबद्दल केंद्रिय कार्यकारिणी व राज्य कार्यकारणी यांच्या आदेशाप्रमाणे घेण्यात आली.यावेळी ऍड. एस.एस. वानखडे(राष्ट्रीय सचिव व प्रशिक्षण विभाग प्रमुख) तसेच भिकाजी कांबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ) व राज्याचे सरचिरणीस सुशिलकुमार वाघमारे, जिल्हा पूर्व व पश्चिमचे अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी, केंद्रिय शिक्षक , शिक्षीका ,बौद्धाचार्य उपासक-उपासिका उपस्थित होते.सदरची सहविचार सभा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडली. सर्वांना पूर्वीचे गैरसमज, हेवे-दावे विसरून महाविहार बांधकाम पुर्ण करण्याचे सर्वानी मान्य केले. व्ही.आर.थोरवडे यांनी महाविहार तसेच जिल्हा शाखेचा व पर्यटनाबाबतचा बरेच दिवस रेंगाळलेला कार्यभार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी सादर करण्याचे अभिवचन दिले. सदरच्या सभेस जिल्हाध्यक्ष एस.के.ढापरे (पश्चिम) व श्रीमंत घोरपडे ( पूर्व),अरुण गायकवाड (अध्यक्ष, ऑडीट कमिटी) व महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही. आर. थोरवडे उपस्थित होते. हजर होते . तानाजी बनसोडे (सरचिटणीस) यांनी सूत्रसंचालन केले तर अशोकराव भालेराव (जिल्हा कोषाध्यक्ष,पश्चिम) यांनी आभार मानले.