देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
बलात्काराच्या गुन्ह्यात गेल्या दिड महिन्यांपासून पसार असलेला आरोपी पोलिस उप निरीक्षक सज्जन किसन नाऱ्हेडा याला न्यायालयातुन अंतरिम जामीन मंजूर झाला असून आज दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी तो राहुरी पोलिस ठाण्यात स्वतः हून हजर झाला.
राहुरी शहर हद्दीत दिनांक १७ जुलै २०२३ रोजी एका निराधार महिलेवर राहुरी पोलिस ठाण्यातील सज्जन किसन नाऱ्हेडा या पोलिस उप निरीक्षका कडून बलात्कार केल्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. गेल्या दिड महिन्यांपासून पोलिस पथकाकडून आरोपी नाऱ्हेडा याला अटक करण्याचे कागदोपञी प्रयत्न सुरू होते.
दरम्यान आरोपी सज्जन किसन नाऱ्हेडा याने ॲड. महेश तवले यांच्या मार्फत अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज ठेवला. आरोपी सज्जन नाऱ्हेडा याचा न्यायालया कडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
आरोपी पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हा आज दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी स्वतःहून राहुरी पोलिस ठाण्यात हजर झालाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत.बलात्काराच्या घटनेतील आरोपी हा पोलिस उप निरीक्षक असल्याने पोलिस यामहिलेला खरोखर न्याय देतील का? असा प्रश्न सर्वसामान्य वर्गातून केला जात आहे.