सातारा : म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा नसल्यामुळे रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अजिनाथ केवटे यांनी आंदोलन सुरु केले होते.या आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्याने आरोग्य विभागाने दखल घेतली असून नवीन जागेत गृह बांधणार असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
मृत व्यक्तीला शवाविच्छेदनासाठी दहिवडीला न्यावे लागत आहे.त्यामुळे केवटे यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांना अनेक संघटना व कार्यकर्ते आंदोलनस्थळी भेटून पाठींबा जाहीर करीत होते.तेव्हा संबंधितांनी योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा. अशी मागणी होत असल्याचे वृत्त प्रामुख्याने पत्रकार अनिल वीर यांनी दिल्याने जिल्हा आरोग्याधिकारी व प्राथमिक आरोग्याधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र केवटे यांना देण्यात आले असून त्यात वर्तमान पत्राच्या बातमीच्या अनुषंगाने असा उल्लेख संदर्भ म्हणुन केलेला आहे.त्यामुळे केवटे यांनी आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित केले आहे.पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नगरपालिका अथवा शासकीय जागा उपलब्ध करून नवीन शवविच्छेदन गृह शक्य तितक्या लवकरात लवकर बांधकाम करण्याचा प्रस्ताव असल्याचा पत्रात उल्लेख जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.महेश खालीपे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी केला आहे.