पैठण,दिं.७.(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील वडवाळी येथील सरपंच किशोर काळे पाटील, उपसरपंच योगेश पाचे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांची भेट घेतली.
यावेळी गावातील विविध विकास कामा संदर्भात निधीची मागणी करण्यात आली यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तात्काळ निधी देण्याचे मान्य केले. यावेळी राज्य दुध संघाचे संचालक नंदलाल काळे पाटील,गणेश अण्णासाहेब घोंगडे,मनोज जाधव, गणेश रामनाथ घोंगडे, सोपान गाढे, प्रभाकर पाचे, बाबासाहेब गायकवाड,गणेश शिंदे, योगेश काळे सह आदी उपस्थित होते.