कोपरगाव : काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्ह्यात सक्षम असून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अनुसूचित जाती विभाग सक्षम करण्याचं काम वाघमारे यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले . काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कोपरगांव शहराध्यक्षपदी विलास जाधव तर मनोहर कोकाटे,दत्तात्रेय दांडगे यांची शहर उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे,माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुनिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.अ.जा.विभागाचे सरचिटणीस बंटी यादव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिट चे श्री. नितीनराव शिंदे,नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे,कोपरगांव तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव.
यावेळी आ.थोरात साहेब यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच भरभरून कौतुक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्याकडून जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा आढावा घेऊन आ.थोरात यांनी समाधान व्यक्त केले.