सातारा/अनिल वीर : कालकथित सिंधू रविंद्र सोनावले यांचा चतुर्थ स्मरण दिन कार्यक्रम आम्रपाली निवास विक्रम नगर, पाटण येथे आयोजित करण्यात आला होता.तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,उपासक व उपासिका यांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
प्रथमतः महापुरुष व सिंधुताई सोनावले यांच्या प्रतिमेस सर्व परिवाराने पुष्पहार अर्पण केला.यावेळी तालुक्यातील सर्व धार्मिक,सामाजिक व राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी उपस्थित होते. बौध्दाचार्य अरविंद गुजर यांनी संपूर्ण विधी पार पाडला.संयोजक म्हणून समस्त सोनावले व गुजर परिवार मौजे कवडेवाडी (कातवडी) यांनी काम पाहिले.पश्चिम महाराष्ट्र आरपीआयचे (आठवले) सचिव प्रा.रवींद्र सोनावले, राजु सोनवले व सर्व सोनावले परिवार यांनी आभार मानले.