उपवासाचा महिना
रमजान असे पवित्र
तन मन दोन्ही शुद्ध
साजे ईद उल फित्र…
नसावी मनी दुश्मनी
बनवा सकला मित्र
भाईचारा भाई जान
बदलूनि टाकी चित्र…
चादर पाघरां गरीबा
अल्लाह देईल छत्र
भुकेल्या देता घास
बंदा बनने को पात्र…
मोहम्मदाच्या कृपेने
पाक पावन चरित्र
दान धर्म सदैव करी
सुरु होई नवीन सत्र…
आमीन बोले प्रेषीत
अल्लाकी दुवा पात्र
ईदचंद्राची शीतलता
सुखे मोहरे गात्रगात्र…
इबादत आली फळा
बदलले जीवन सुत्र
क्षीर कुर्मा वाटताना
खुपमिळाले सन्मित्र…
सर्व धर्मियां निमंत्रण
समस्त जन ये एकत्र
उत्साह वर्धन सर्वत्र
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996