माय बाप वृध्दाश्रमी
पहा मुलांचे कौशल्य
प्रॅक्टिकल विचार हा
कसलेचं नाही शल्य..
कसे सहज तोडतात
नाते संबंध ते अमूल्य
मायबापामुळे भविष्य
घडे आपले जाज्वल्य …
घरांबाहेर काढून तया
कामगिरी करे अतुल्य
स्नेहमाती ढिलीझाली
पाळेमुळे होई निर्मूल्य….
एकतर्फीमाया कसली
अंतरात वोखटे लौल्य
जन्मदाते देत राहतात
सेवा केवळ विनामूल्य ….
मोठी झाली मुले मुली
मिळाले मोठे साफल्य
आईबापां नशिबी मात्र
अकाली आले वैफल्य …
प्रगती केली इतकी ती
नात्यांचे विसरले मूल्य
वांझपणा परवडला हो
नसावे असले बा पाल्य …
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.