गगनचुंबी ..

0

गगनचुंबी  इमारती

बांधावी मंत्र्यांसाठी

होईना  खर्च  थोडा

जरा  शेकडो कोटी

बांधावरी  हिंडतात

उभे बळीराजापाठी

राहती सुखे  बिचारे

नाही  ही उधळपट्टी

वीजपाणी फुकटात

मागू नकात घरपट्टी

विरोध करणारे वेडे

उगाचं  फालतू  हट्टी

मंत्री  प्रशस्त फुगले

गाडी घ्यायची मोठी

पेट्रोलडिझेल फुल्ल

डिमांड अगदी छोटी

नियमांत बांध घरटी

सामन्यांसधरले वेठी

नेत्यांचे इमले सजले

असेना कितीही त्रुटी

पेंशनवृध्दी करताना

नकात  काढू रे त्रुटी

दणकट असो  मस्त

म्हातारपणाचीकाठी

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996..

www.kavyakusum.com

२)

भक्कम बिल्डर ..

बिल्डर  होई भक्कम 

इमारती  पडे  धडाड

तीचं  तसलीचं घटना 

नाव  बदलले  महाड 

अधिकारी लालफिती 

पुढारी  करतात लाड

पंचनामे  नावा  पुरते

कुणा न कसली चाड

गरीबांच्या संसारावर

जोरा कोसळे  पहाड

कण कण जमवलेला

संसार उघडा  उजाड

रोपातून वाढवी झाड

तुमच्या हाती कु-हाड

कागदी  घोडे  नाचवा

झोळी  रिक्त  ओसाड

सगळीकडे हाड हाड

कुठे न्यायचे  बि-हाड

बरबाद  होता  सगळे

मदतीचे येईलं व-हाड

सर्व बुढ्ढ्या  इमारती

एकाच आदेशात पाड

भक्कम बिल्डर लाॅबी

कुणाचालागणार पाड

-हेमंत मुसरीफ पुणे

 9730306996..

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here