सत्ता स्थापने साठी
करावे खुशाल दावे
बळा बळ कितीही
सत्ता स्थान ते द्यावे…
भवितव्यउजळण्या
या सत्तेसोबत जावे
रूसूनकधीतर गेलो
स्वगृहात पुन्हा यावे…
निंदा नालस्ती केली
गुण गान त्यांचे गावे
मिडिया असे टपली
लागती हळूचं सुगावे…
अधूनमधून जयकार
महान पुरुषांची नावे
जाती धर्मा पकडता
खुर्च्या आपल्या नावे…
सहानुभूतीच्या लाटा
बरोबर सगळी गावे
आपल्यासोबत चाले
वाहतूक भरारा धावे…
समर्पितआयुष्य द्यावे
जन जनार्दनाच्या सेवे
दुजे सुख नसे या सम
अनंतआशीर्वाद घ्यावे…
सत्ता कर्मयोग साधन
सेवाकरावी मनोभावे
रयते कामाने जिंकावे
खुर्ची पाठी मागे धावे…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६..