भरटकलो चोहीकडे
शोधत तुजला वृथा
रे कळेना ना सांगता
जाणली माझीव्यथा…
हृदय झाले पंढरपूर
वसेआंत पंढरीनाथा
का जावे देशाटनांस
रे पांडुरंग येता स्वता…
नित्य ध्वनी कानावर
हरिपाठ ती हरिकथा
सत्संग अवचित घडे
वाचताना संत गाथा…
श्रीकृष्ण बने सारथी
चालवतो संसार रथा
नामस्मरण स्मरे जरी
संपन्नकरतो मनोरथा…
वारकरी ते घरी येता
सेवाकरी जमेल यथा
चालू ठेवली इतकेचं
पूर्वजांची जुनी प्रथा….
घासातला देई घास
पाठवे ना कुणा रिता
कधी ना पडले कमी
वाहत राहिली सरिता…
सुख स्नेही समाधान
येई आनंदाचा जथा
परलोक सुख भोगी
इहलोकी मी सर्वथा…
-हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
2)

जागावाटप बैठकीत
दिवस रात्र खळखळ
प्रत्येकाच्या मनामध्ये
पांढरे आपले ऊखळ…’
खानपान मजेत चाले
अति निर्णय निष्फळ
कुंभकर्ण झोपा काढे
जेवणा पडे जायफळ
उमेदवारी हट्ट करती
भाऊ गर्दीत बक्कळ
कुंपणावर ठाण मांडे
असेचं पुढारी पुष्कळ
सोडून जाऊ का पक्ष
बडबड करी बाष्कळ
पक्षासाठी काय केले
कार्यकर्ते ते निष्कळ…
पक्षा बद्दल भावस्पर्श
कधी न वाटे तळमळ
कायदिले मज पक्षाने
कायम मनी मळमळ…
यादी मध्ये नाव नाही
हळूचं ओकती गरळ
कारवाई एका करता
बाकीचे होतात सरळ…
पक्षांतर व्याधी जडते
जोरात होई पानगळ
पक्षी उडतात भुर्रकन
दिसेलं जिथे पानथळ…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.