हडपसर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज येथील 2 महाराष्ट्र बटालियनचे तीन एन.सी.सी. कॅडेट्ची नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनासाठी निवड झाली आहे. जीएसयूओ प्रणव माणिक चिंचकर, वैष्णवी नानासाहेब गर्जे आणि महेश मच्छिंद्रनाथ गर्जे हे या वर्षी कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२५ रोजी पंतप्रधान यांच्या ध्वजसंचलन समारंभात सहभागी होत आहेत. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनासाठी एन.सी.सी. कॅडेट्सची निवड होणे ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. आणि या वर्षी निवड झालेले कॅडेट्स हे देखील कर्तव्यपथावर परेड करणारे पहिलेच आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयाने दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कर्तव्यपथ परेड मध्ये आपले एन.सी.सी. चे कॅडेट्स पाठविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सध्या एन.ओ. म्हणून लेफ्टनंट प्रा. राधाकिसन मुठे काम पाहत आहेत. या सर्व कडेट्सचे रयत शिक्षण संस्थेचे विभागीय चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार चेतन (दादा) तुपे – पाटील, सदस्य दिलीप (आबा) तुपे-पाटील, सदस्य अमर हरिदास तुपे, प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे, उपप्राचार्य प्रो.डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, प्रा. किसन पठाडे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी मिळवलेल्या या यशामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन सेवक व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे.