आदर्श युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांची शेती पाण्यासाठी आत्महत्या

0

बुलढाणा : शेतकऱ्यांनी शेती करायची किंवा नाही? असा प्रश्न आता शासनाला विचारण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. आणि त्याचा कारणही तसंच आहे. आज एन होळी सणाच्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावच्या राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या कैलास नागरे या शेतकऱ्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील 14 गावांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमीच प्रमाणे त्यांची आश्वासन देऊन बोळवण केली. यामुळे पिके जळून प्रचंड नुकसान झाले . या नैराश्यातूनच नागरे यांनी आपले जीवन संपवले.

ऐन सणाच्या दिवशी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आज एका आईने आपला मुलगा गमावला , एका पत्नीने आपला पती गमावला , मुलांनी आपला बाप गमावला , शेतकऱ्यांनी आपला सहकारी गमावला . मात्र  हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे? शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, गेले तीन महिने कैलास नागरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळेल या आशेवर काढली. मात्र नेहमीप्रमाणे शासनाची आश्वासने हवेतच विरली आणि ऐन होळी सणाच्या दिवशी कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर याप्रकरणी लवकरच शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशाराही मृतक शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नीने दिला.

कैलास नागरे यांनी आपलं जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी तीन पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. या शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाईड नोट मिळाल्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कन्फर्म केलं आहे. कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांने अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता. गेला डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं. 

मात्र, परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे. सध्या पोलीस या ठिकाणी पोहचले आहे. कैलास नागरे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे, या ठिकाणी हजारो शेतकरी या ठिकाणी जमले आहेत.

सरकार पुरस्कार देते मात्र शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही : हर्षवर्धन सपकाळ राज्य शासनाने या शेतकऱ्याला नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार दिला पण त्याला सरकार न्याय देऊ शकले नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले. सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलाही कळवळा नसून फक्त राज्यात जातीय तेढ या सरकारला निर्माण करायचं आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here