सर्वोत्तम समजावे
ग्राहकांचे समाधान
उच्चस्तरी सेवाहवी
ठेवा नीट अवधान …
ग्राहकांस हवे काय
जाणावे त्याचे मन
संतोषाचे पाठोपाठ
आपोआप येई धन…
सचोटी ही कसोटी
द्यावेत्या उच्चस्थान
खोटेपणा घातकरी
नकोवृथा अभिमान…
ग्राहकांशी घट्ट नाते
विशेष त्या दे ध्यान
टाळावा वादविवाद
नकोकधी घमासान …
ग्राहक हा देव खरा
महात्माजींचे वचन
कृतीत यावे विचार
कर्मयोगाचे सिंचन ..
फसवे वायदे नको
मृगजळी भुलावण
गरजवंत दोघेजण
ठेवा सदा आठवण…
ग्राहक देव ..
वातानुकूलित माॅल
आकर्षक ती दुकाने
वाढत जाई डिमांड
भरत राहती रकाने
बाजूला रे अन्नधान्ये
खरेदी करी प्रसाधने
जाहीराती भुलावण
दुषीत करे सारी मने
स्वस्त मिळे म्हणून
घ्या भरभरूनि जुने
खिशात खडखडाट
क्रेडिट कार्ड हो उणे
तिथले सरकते जिने
हैराण करे सारेजीणे
सवय शान शौकीची
विसरलो साधेजगणे
गात रहा अंगाईगाणे
ग्राहक जागृत म्हणे
ग्राहक दिना निमित्त
वाजवा तेचं तुणतुणे
ग्राहक हाचं परमेश्वर
महात्माबापूजी म्हणे
ग्राहकविना सर्वं उणे
खरे सार तेचि जाणे
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996