एप्रिल का …/फुल्ल फूल …

0

कुणी  कधीही  येतो

आम्हां मुर्ख बनवतो

भूलथापा मारे गप्पा

सहज असे  गंडवतो…

आम्हीभक्त होई वेडे

आत्मा तया थंडवतो

असे पागल होईकसे

प्रश्न एकचं भंडावतो…

आश्वासनां फसेअसे

हसून  सारे जिरवतो

मुर्खपणाची झूल ही

अंगावरती  मिरवतो…

उंटा  वरला  शहाणा 

शहाणपण शिकवतो

वासरात लंगडी गाय

भला कसा वाकवतो..,

एक एप्रिलचा दिवस

भल्यासही  झुकवतो

फूलहोणं शहाणपणं

हाप मॅडला वाकवतो…

ऑल द टाईम फूल रे

जुने अध्याय गिरवतो

मुर्खाच्या बाजारामधे

रे शहाणपण  हरवतो….

फुल्ल फूल ..

अच्छेदिन आलेआले

नाचतो आम्ही  भोले

पेट्रोल  गाठते शंभरी

सुखात भिजून ओले

लाईट बील   मोठाले

चुपचाप  सारे  भरले

वीजमाफी आश्वासन

पाणी मध्यात  जिरले

हमीभावाच्या आशेने

कांदे   टोमॅटो  सडले

नवीन कर्जचं मिळेना

रे  जुने सगळे  फेडले

आरक्षण भिजे कोर्टा

भरधाव घोडे  अडले

झाले  झाले  म्हणता

किती  वेळा  रखडले

व्यवहार सारे  अडले

त्या कोरोनाने पिडले

पुन्हा तो लाॅकडाऊन

हे  अंगवळणी  पडले

मुर्ख  बनवा आम्हांस

डोके सदैव  बिघडले

एप्रिल फुल  कशाला

कायम जातो  रगडले

— हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here