अनिल वीर सातारा : भारतीय बौद्ध महासभा शाखा – जिल्हा सातारा (पश्चिम) व शाखा तालुका कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविहार, कराड येथे प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, सरचिटणीस दिलीप फणसे, महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी शाखा कराड तालुकाध्यक्ष यशवंत (आप्पा) अडसुळे होते.
प्रथमता: राजा सम्राट अशोक व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केलेल्या आव्हानानुसार जिल्ह्यात व तालुक्यात घेण्यात आले. ज्याप्रमाणे भीम-बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.त्याप्रमाणे सम्राट अशोक यांचीही जयंती साजरी करण्यात यावी.त्या अनुषंगाने सर्व बौद्ध उपासक,उपासिका, संस्थेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.मान्यवरांनी सम्राट अशोक यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकण्यात आला.दादासाहेब कांबळे यांनी स्वागत केले. नंदकुमार भोळे (तालुका कोषाध्यक्ष) यांनी आभारप्रदर्शन केले.