संस्था ..
धर्मादाय काहीसंस्था
कशी दयनीय अवस्था
व्याधी ग्रस्त स्वता:चं
ढासळू गेली व्यवस्था
कशी सावरावी घडी
कसे कळणारं तटस्था
मनात वादळे हिंदोळे
कसे समजवे त्रयस्था
चोहोबाजूंनी युध्दघडे
जाणीव नसे अंतस्था
आतलाकलह मातता
कसेसावरावे बहिस्था
जिथे मिळे अमृतकुंभ
संजीवन दे अत्यवस्था
रुजूलागता विषवल्ली
कशी लपे अस्वस्थता
काय वाटेलं विश्वस्था
डोळ्यांसमोरअनास्था
फुलवल्यानंदनवनाची
कशी केली दुरावस्था
धर्मादाय ख-या संस्था
जणूं परमेश्वर फरिस्ता
दाता अन् वंचितामध्ये
विधाता जुळवी रिस्ता
अभय दत्त कृपा छत्र
निर्भय करे भयग्रस्ता
घडले हातून सत्कार्य
अंतरात्म्यासस्वस्थता
टॅरिफबाॅम्ब ..
ट्रम्पचा टॅरिफबाॅम्ब
शेअरबजारकोसळे
संधीसाधू बाई मंदी
पुन्हा उत्साहे उसळे
दिस दिसले जराबरे
केरात जाती मुसळे
महासत्तेच्या युध्दांत
अर्थ जगत हे घुसळे
महामस्तवाल डाॅलर
वर्तन करे धसमुसळे
गर्भगळीत गरीबदेश
स्पष्टदिसती फासळे
साठमारीउच्चपदाची
निर्दोष भोगती फळे
सावरते अर्थव्यवस्था
रे पुनश्च अवसानगळे
बासरी वाजवी न्युरो
बेजारबाजार रे जळे
काळीकरे अन्य तोंडे
चेहराआपला उजळे
मानवता शेअरविक्री
राक्षसी आनंद मिळे
उध्वस्त होईआकांक्षा
निरांकुश निर्णयामुळे
मृत टाळू वरचे लोणी
आक्रोश काढतो गळे
विजयीमाळा घालूनि
सुशोभित करता गळे
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.