ज्योतीबा न् सावित्री
आदर्श ते सहचारण
फुले दाम्पत्य जीवन
कुटूबांस दे उदाहरण…
हातात घेऊनि हात
करे समाज उध्दारण
वर्गास समस्त सहज
मिळू लागले शिक्षण…
समाज संसार गाडा
ते ओढती दोघे जण
अशी ना दुजी जोडी
जमलेले छत्तीस गुण…
निंदानालस्ती टिका
सोसे अपशब्द घण
कुणी दिल्याधमक्या
कुणी उडविले शेण…
विधवा परित्यक्तांना
दिधले सुखाचे क्षण
सत्य शोधक समाज
म्हणून करी स्थापन…
करेअजून मार्गदर्शन
अशी सार्थ शिकवण
फुले दाम्पत्यां तुमचे
कधी न फिटेलं ऋण…
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.