बदनापूर (जालना )
बदनापूर पोलीस हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे,या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत,आमदार नारायण कुचे यांनी दोन महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षकांना तंबी देत अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र देखावा म्हणून दोन दिवस अवैध धंदे बंद करून आर्थिक वाढ करीत पुन्हा जोमाने अवैधधंदे सुरु झालेले आहे,बदनापूर -संभाजीनगर महामार्ग रस्त्यावर राजरोसपणे देह विक्री ,जुगार व्यवसाय सुरु असतांना पोलीस केवळ बंद केल्याचा आव आणून कांगावा करीत असले तरी सोमवरी दुपारी एका सामाजिक कार्यकर्त्याने देहविक्री व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी पंधराशे रुपये अदा करून चक्क व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हारयल केला आहे त्यामुळे बदनापूर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाणे म्हणजे कमाईचे महत्वाचे ठिकाण त्यामुळे सदर पोलीस ठाणे मिळविण्यासाठी अनेक पोलीस निरीक्षक प्रयत्नशील असतात ,या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार,देशी,विदेशी,हातभट्टी दारू ,वेश्या व्यवसाय ,मटका ,अवैध वाळू ,चक्री आदी व्यवसाय चालतात ,सदर धंद्यांना अधिकृत परवानगी नसते मात्र काही पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांशी दोन नुंबरचे व्यवसाय करणाऱ्या मंडळींचे आर्थिक देवाण घेवाण संबधं असतात व त्यांतुन अवैध धंदे राजरोसपणे सुरु असतात ,या व्यवसायांची तक्रार पोलिसात एखाद्या व्यक्तीने केल्यास त्यास सदर व्यवसायिक मारहाण करतात किंवा धमक्या देतात आणि पोलीस देखील त्यांना सहकार्य करतात अश्या अनेक घटना घडलेल्या आहेत यामुळे तक्रार करण्यास कोणी हि व्यक्ती पुढे येत नाही.
बदनापूर पोलिसांच्या हद्दीत सुरु असलेहिले अवैध धंदे बंद करण्याची मागणी अनेकांनी केल्यानण्त र बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांना तांबी देत अवैध धंदे बंद करण्याची सूचना दोन महिन्यापूर्वी दिली होती व त्याची अमलबजावणी केवळ दोन दिवस झाली आणि पुढे जैसे थे परिस्थिती पुन्हा बनली आहे,बदनापूर पोलिसांच्या हद्दीत बियर बार ची संख्या जवळपास २० ते २५ आहे या पैकी काही ठिकाणी देहविक्री केली जाते,बाहेरून मुली आणून देहविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालत आहे ,कस्टमरला १५०० रुपये अदा करावे लागते आणि रूम मध्ये मुलगी उपलब्ध होते ,काही म्हण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीवर सविस्तर वृत्त प्रसारित झाले होते मात्र त्याचा तिळमात्र परिणाम पोलिसांवर झाला नाही ,केवळ अवैध धंदे बंद आहेत अश्या बातम्या काही लोकांना हाताशी धरून प्रकाशित करून घेऊन पोलिसांनी पडदा पाडला मात्र प्रत्यक्षात धंदे बंद झाले नाही. सोमवार ८ आप्रील रोजी एका व्यक्तीने महामार्ग रस्त्यावर सुरु असलेल्या देहविक्रीच्या ठिकाणी भेट दिली व कॉउंटर वर फोन पे द्वारे एक हजार पाचशे रुपये हॉटेल चालकास अदा करताच त्यास एक तरुणी उपलब्ध करून देण्यात आली. असता त्या व्यक्तीने एक व्हिडीओ बनविला व तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला पाठोपाठ दुसऱ्या हॉटेल वर जाऊन त्या ठिकाणी लाखो रुपयाची उलाढाल होत असलेल्या जुगार अड्ड्याचा व्हिडीओ बनविला तो देखील व्हारयल केल्याने पोलिसांचे पितळ उघडे पडले असून सध्या दोन्ही व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. सध्या बदनापूर तालुक्यात चक्री ,मटका ,जुगार ,देहविक्री व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत हे विशेष.