एखाद्या व्यक्तीला किती वेळा Heart Attack येऊ शकतो? कोणत्या वयात कोणत्या लोकांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका?

0

[ad_1]

गेल्या काही वर्षांमध्ये Heart Attack मुळे अनेकांचे जीव गेले आहेत. हृदयरोग हा खराब आहार, बिघडणारी जीवनशैली, ताणतणाव आणि अनेक आरोग्य समस्यांमुळे होतो. कोविड-16 संसर्गानंतर हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांना जिम करताना हृदयविकाराचा झटका येतो, काहींना नाचताना किंवा गाताना हृदयविकाराचा झटका येतो आणि काहींना चालताना हृदयविकाराचा झटका येतो. लहान वयातच लोक हृदयरोगी होत आहेत. आता अलिकडेच एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलंय. 

कोणत्या वयात कोणत्या लोकांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका?

Heart Attack हा कोणत्याही वयात होऊ शकतो. सामान्यतः, हार्ट अटॅक 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पुरुषांना आणि 55 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांमध्ये अधिक दिसून येते. गेल्या अनेक वर्षांत, तरुणांमध्ये अस्वस्थ कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येत आहे. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. 19-24 वयोगटातील लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दिसून आली आहे. आजकाल, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका 50 टक्क्यांनी वाढल्याचा पाहिला मिळतो.

लीलावती रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विद्या सुरतकल यांच्या मते, भारतात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. तरुणपणी दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल दिसून येते. कमी-घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) आणि उच्च-घनतेचे लिपोप्रोटीन (HDL) असतात. एलडीएल कोलेस्ट्रॉल तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. एचडीएल हे हृदयासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आहे. 19-24 वयोगटातील लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असते. हे खाण्याच्या वाईट सवयींमुळे घडते. त्याच वेळी, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बहुतेकदा 35-50 वर्षे वयोगटात असतो. 10 पैकी 7 जणांना उच्च कोलेस्ट्रॉलचा आजार असतो. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही दिसून येत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान, अनुवांशिक विकार, थायरॉईड समस्या, अस्वास्थ्यकर आहार, उच्च रक्तदाब आणि कमी किंवा अजिबात शारीरिक हालचाल नसलेल्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका असतो.  

एखाद्या व्यक्तीला किती वेळा Heart Attack येऊ शकतो? 

तज्ज्ञ सांगतात की, एखाद्या व्यक्तीला तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण हे आवश्यक नाही, काही प्रकरणांमध्ये तीनपेक्षा कमी किंवा तीनपेक्षा जास्त हृदयविकाराचे झटके येण्याची शक्यता असते. तर 45 वर्षांच्या वयानंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये 45 वर्षांनंतर Heart Attack धोका वाढतो. तर महिलांमध्ये साधारण 55 वर्षांनंतर त्याहून अधिक वयामध्ये तर रजोनिवृत्तिनंतर Heart Attack धोका असतो. 

लहान वयातच हृदयविकाराचे झटके का येतात?

लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागे अनेक कारणे जबाबदार असतात. वाईट जीवनशैली, ताणतणाव, अस्वास्थ्यकर अन्नाचे जास्त सेवन आणि लठ्ठपणा यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

हृदयविकाराची लक्षणे

लहान मुलांमध्ये ओठांभोवती निळे डाग हृदयविकाराचे लक्षण आहेत.
मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे.
थोडा वेळ चालल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होणे
बाळाच्या शारीरिक विकासाचा अभाव.
मुलाला छातीत दुखणे आणि चक्कर येण्याची तक्रार असू शकते. 

मोठ्या लोकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी!

हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. सर्वप्रथम, तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. दारू आणि धूम्रपान यासारख्या वाईट सवयी सोडून द्या. 

तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, अधिक फळे आणि भाज्या खा. त्याच वेळी, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्य तितके कमी खा. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, जास्त व्यायाम करण्याऐवजी योगा करा.

छातीत दुखणे, दातदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ होणे इत्यादी हृदयाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरकडे जा. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here